जेलवारीची हवा, भ्रष्टाचाराचे डाग आणि घराणेशाहीचे सावट —-------------------------------------
चाऊस यांना माजलगावचे मतदार स्वीकारणार का?
----------------------------------------
माजलगाव / प्रतिनिधी
भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांत अटक होऊन ‘जेलवारी’ करून परतलेल्या माजी नगराध्यक्ष चाऊस यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजलगावच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. “अशा वादग्रस्त नेतृत्वाला माजलगाव चे मतदार स्वीकारणार का?” अशी थेट चर्चा शहरातील मतदारांमध्ये ऐकावयास मिळत आहे. दरम्यान, आमदारांच्या नावाने रडून पडून. व जनतेसमोर भावनिक हाऊन भूतकाळ पिच्छा सोडत नसतो. ५ कोटी ५७ लाख रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप असल्यामुळे आपले पानिपत होती की काय याची मनात भीती असल्याकारणाने भावनिक होऊन व अश्रू गाळून चाऊस यांनी जनतेला मी कसा धुतलेल्या तांदळाप्रमाणे आहे असा केविलवाणा प्रयत्न करून नोटंकी विषय शहरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. “भ्रष्टाचाराचा मुद्दा खोडून काढण्यासाठी सहानुभूतीचं राजकारण करणार का?” असा सवाल नागरिक करीत आहेत.नगरपालिकेतील आर्थिक अनियमितता, निविदांतले संशयास्पद व्यवहार आणि प्रशासनातील बेजबाबदार कारभार यामुळे नगरपालिका अक्षरशः गिळंकृत केल्याची नाराजी आजही शहरवासी यांच्या मनामध्ये ताजी आहे. त्यातच स्वतःवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची धूळ अजून पुसणे बाकी असताना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून सहाल चाऊस यांनी मोहन जगताप यांना हाताशी धरून स्वतःच्या घरातील तब्बल तीन उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनाही धक्का देणारा ठरला आहे. शहरातील अनेक वर्षांपासूनचा अतिक्रमण हटाव हा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना मात्र चाऊस हे सत्तेत असताना या प्रश्नावर कायम मौन पाळल्याने भविष्यातही हा मुद्दा कायमच दडपला जाईल, अशी शहरवासीयांची ठाम भावना आहे. “नगराध्यक्ष पद परत चाऊस घराण्यात गेलं तर अतिक्रमण हटणार नाही,” असा आत्मविश्वास मतदार खुलेआम व्यक्त करीत आहेत. मातंग समाजाचे मोठ मोठे कार्यकर्ते शहरात असतानाही या समाजातील एकाही व्यक्तीस उमेदवारी न देता स्वतःच्या घरातील तीनही जागा काबीज आणि चाऊस म्हणतात “जागा २६, इच्छुक ३००…मग उमेदवारी द्यायची कुणाकुणाला! मग तीन-तीन उमेदवार फक्त स्वतःच्या घरात!” असा संतप्त सवाल उठू लागला आहे. माजलगावकरांच्या मनातला रोष, भ्रष्टाचाराच्या आरोपांची जखम आणि घराणेशाहीची झालर
या सर्व गोष्टीवर मतदारांचा विश्वास कसा बसवणार?

